
बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
Krishna Janmashtami 2026: श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर आतुरतेने वाट पहिला जाणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. यादिवशी बाळकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ सप्टेंबरला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक महिला आणि पुरुष उपवास करतात. याशिवाय कृष्णाचा जन्म सोहळा सुद्धा साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने पूजा करून गोपालकाला किंवा मखान मिश्रीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या खास दिवशी तुम्ही सुद्धा नातेवाईक आणि मित्रमैत्रणींना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून सणाचा आनंद वाढवू शकता.(फोटो सौजन्य – AI)
नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा
नंदलालाच्या आगमनाने आनंद फुलावा,कृष्णकृपेने प्रत्येक दिवस सुंदर व्हावा,
मनातील प्रत्येक संकल्प पूर्ण व्हावा,जन्माष्टमीचा आनंद सर्वांच्या घरी नांदावा!
जिथे कृष्णाचे नाव, तिथे आनंदाची चाहूल,
जिथे कृष्णाची भक्ती,
तिथे मनाला समाधानाची भूल,
कान्हाच्या कृपेने जीवन होवो सुंदर,
अनमोल,जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
नात्यांमध्ये राधेसारखा निस्वार्थ भाव असावा, आणि संकटात कृष्णासारखा पाठीशी उभा राहणारा सखा असावा…
तुमच्या आयुष्यात हाच आनंद कायम राहो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
कृष्णाच्या चरणी भक्ती असावी,
मनात नेहमी प्रसन्नता असावी,
घरात सुख-शांती नांदावी,
जन्माष्टमीची मंगलमय शुभेच्छा असावी!
नंदलालाच्या जन्माचा आनंद साजरा करूया,
प्रेम आणि भक्तीने मन सजवूया,कृष्ण नामाचा गजर करत सुख मागूया,
सर्वांन जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया!
गोकुळातील आनंद तुमच्या घरी यावा,कृष्णाच्या कृपेने प्रत्येक दुःख दूर जावे,प्रेम, सुख आणि समाधान लाभावे,
जन्माष्टमीचा सण आनंदात साजरा व्हावा!
हे नंदलाला, तुझ्या कृपेची सावली सदैव आमच्यावर राहू दे,
प्रत्येक संकटात तुझी आठवण मनाला बळ देऊ दे.
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
माखनचोराच्या खोड्यांनी
आणि मुरलीच्या सुरांनी
तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो.
गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गोकुळात नांदे नंदलाला,
ओठी त्याच्या मधुर बासरीची तान…
श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात
सुख, समाधान आणि आनंदाची बरसात होवो!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नटखट कान्हाच्या लीलांप्रमाणे तुमचे आयुष्यही
आनंदाने आणि उत्साहाने भरून जावो
दहीहंडी आणि गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!
माखनचोर, बासरीवाला कान्हा
तुमच्या घरातील सर्व दुःख दूर करून सुख-समृद्धीचा वर्षाव करो
गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
बाळकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो
जन्माष्टमीच्या या पवित्र पर्वावर तुम्हा सर्वांना उदंड आयुरारोग्य लाभो!
यशोदेचा हा लाडका कान्हा
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करो
आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेवो
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!