
Brain Health
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राष्ट्रीय पोषण संस्था(ICMR-NIN) ला अभ्यासातून मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य पोषण किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला आहे. या संशोधनात नमूद करण्यात आले की शरीरातील व्हिटॅमिन B12, B6, B2 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास लोकांना मेंदूचा गंभीर आजार डिमेन्शियाचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे.
डिमेन्शियाचा आजार हा मेंदूशी संबंधित असून यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. याशिवाय विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची, दैनिदिन कामे करण्याची आणि वर्तनामध्येही बदल होऊ लागतात. वाढते वय हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र जीवनशैली आणि आहाराचाही यावर मोठा प्रभाव होतो.
तेलंगणातील शहरी आणि ग्रामीण भागातील ४० ते ८० वयोगटातील ५७० नागरिकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून याचा खुलाला झाला आहे. व्यक्तींच्या आहाराच्या सवयी, मेंदूची कार्यक्षमता आणि रक्तातील व्हिटॅमिन्सचे प्रमाण तपासल्यावर लक्षात आले की जवळपास ४० टक्के लोकांमध्ये डिमेन्शियाचा गंभीर आजार आहे. या लोकांमध्ये व्हिटॅमिन D, B2, B6 आणि B12 यांची कमतरता अधिक प्रमाणात आढळून आली होती.
तज्ज्ञांच्या मतेस सतत जंक फूड खाणे, पोषक आहाराचा अभाव, फळे-भाज्यांचे सेवन न करणे आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान यामुळे धोका वाढू शकतो. यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोपर, नियमित व्यायाम आणि आवश्यक पोषक घटकांचा समावेश दैनंदिन जीवनात स्वीकारण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. योग्य वेळी काळजी घेतल्यास मेंदू दीर्घकाळ निरोगी राहिल.
Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात