Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम, ओठांवर दिसून येईल जादू

ओठांवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून घरीच लिपबाम तयार करावे. जाणून घ्या बीटचा लिपबाम बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 23, 2025 | 10:06 AM
थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम

थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम

Follow Us
Follow Us:

हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचा, केस आणि संपूर्ण शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. ऑक्टोबर हिट संपल्यानंतर हळूहळू वातावरणात हलकीशी थंडी जाणवू लागते. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ खूप जास्त कोरडे होऊन जातात. यासोबत ओठ फुटणे, ओठांवरील त्वचा निघणे, लिपस्टिक लावल्यानंतर सुद्धा ओठ कोरडे आणि निस्तेज दिसणे इत्यादी अनेक ओठासंबंधित समस्या उद्भवू लागतात. ओठ कोरडे झाल्यानंतर किंवा ओठ फुटल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे काहीवेळा ओठांमधून रक्त येण्याची शक्यता असते. ओठ कोरडे झाल्यानंतर ओठांवर व्हॅसलिन किंवा किंवा इतर वेगवेगळ्या क्रीम लावल्या जातात.(फोटो सौजन्य – pinterest)

‘या’ जादुई तेलाने होईल केसातील कोंडा त्वरीत फुर्र, गुडघ्यापेक्षाही लांब आणि घनदाट होतील केस

ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे ब्रँडचे लिपकेअर प्रॉडक्ट आणून लावले जातात. पण तरीसुद्धा ओठांवर कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीटचा वापर करून नॅचरल लिपबाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले लिपबाम ओठांवरील त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. बीटच्या रसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक रंग त्वचेवरील त्वचा गुलाबी करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया लिपबाम बनवण्याची सोपी कृती.

बीटचा लिपबाम बनवण्याची सोपी कृती:

लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून घ्या. त्यानंतर बीटचे लहान लहान तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले बीट टाकून वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून घ्या. मोठ्या वाटीमध्ये बीटचा रस, खोबरेल तेल आणि मेण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेला लिपबाम बंद डब्याच्या झाकणामध्ये भरून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. ३ ते ४ तासांनंतर लिपबाम तुम्ही वापरू शकता. घरच्या घरी बनवलेले लिपबाम ओठांवर गुलाबी चमक आणेल आणि ओठ सुंदर होण्यास मदत करेल.

वाढत्या वयात चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वयाच्या 70 मध्ये 20 वर्षांचे

बीटचा लिपबाम ओठांवर लावल्यामुळे ओठांना अनेक फायदे होतात. यामुळे ओठांवरील मऊपणा कायम टिकून राहील आणि ओठ चमकदार सुंदर दिसतील. घरगुती पदार्थांमध्ये कोणतीही रसायन नसतात. हे लिपबाम संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांसाठी अतिशय प्रभावी ठरेल.थंडीच्या दिवसांमध्ये दिवसभरातून तीन ते चार वेळा ओठांवर लिपबाम लावावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Lips constantly chapped in the cold then make a natural lip balm at home using beets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • home remedies
  • lip care tips
  • Skin Care

संबंधित बातम्या

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान
1

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
2

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
3

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे
4

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.