
चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा 'या' पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट
फेसवॉश बनवण्याची कृती?
त्वचेवरील नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी उपाय?
चेहऱ्यावरील तेज कमी होण्याची कारणे?
सर्वच महिलांसह पुरुषांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि डागविरहित हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेसवॉश, फेसपॅक, फेसमास्क तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. नेहमीच स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण आहारात होणाऱ्या बदलांमुळे किंवा कमी पाण्याच्या सेवनामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. दमट वातावरणामुळे त्वचेवर टॅनिंग वाढते. चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
चेहऱ्यावर धूळ, माती, घाम, तेल आणि घाण जमा झाल्यानंतर त्वचा तेलकट होऊन जाते. अशावेळी फेसवॉश लावून त्वचा स्वच्छ केली जाते. पण वारंवार केमिकल युक्त फेसवॉश त्वचेवर लावण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. आज आम्ही तुम्ही केमिकल फ्री फेसवॉशचा वापर त्वचेसाठी कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो आणि ओलावा कायम टिकून राहील आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.
कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तांदळाच्या पाण्यात असलेले अँटी ऑक्सिडेंट्स घटक त्वचेवर नॅचरल ग्लो आणतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. स्किन केअर रुटीनमध्ये डीआयव्हाय फेसवॉसचा वापर करावा. याशिवाय फेशियल स्कीनला डीप क्लिनिंग आणि सॉफ्ट होण्यास मदत होते. त्वचेक आतून पोषण देण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टची आवश्यकता नसते. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर केल्यानंतर काही काळापुरती त्वचा सुंदर दिसते, पण कालातंराने पुन्हा एकदा चेहऱ्यावरील ग्लो निघून जातो.
काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
फेसवॉश बनवण्यासाठी तांदूळ, मध आणि गुलाब पाणी इतकेच साहित्य लागेल. सर्वप्रथम, २ चमचे तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. तांदळाचे पाणी आणि भिजवलेले तांदूळ व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्या. गाळणीच्या मदतीने बारीक कण गाळून काढा. तांदळाच्या पाण्यात मध आणि गुलाब पाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने २ ते ३ मिनिट मसाज करा आणि १ मिनिट थांबून त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसवॉश पूर्णपणे नॅचरल आहे. यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहचणार नाही. त्वचा आतून स्वच्छ होईल.
Ans: चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी त्वचेला अनुकूल नैसर्गिक घटकांचा वापर करता येतो. कोरफड, दही किंवा बेसन यांसारखे घटक काही लोकांना उपयुक्त ठरू शकतात.
Ans: सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क, धूळ-माती, प्रदूषण, त्वचेतील कोरडेपणा आणि अपुरी त्वचा निगा यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो.
Ans: त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून १–२ वेळा सौम्य उपाय करता येतात. त्वचेवर जळजळ किंवा खाज होत असल्यास तो उपाय त्वरित थांबवावा.