या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 5 मे रोजी दिसणार आहे. हे ग्रहण वैज्ञानिक व धार्मिकतेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा चंद्र, सूर्य व पृथ्वीच्यामध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होतं. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी राहू चंद्राच्या जवळ आल्यामुळे अनेक राशींना (Zodiac) याचा त्रास सहन करावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार 5 मे ला असणारं चंद्रग्रहण हे छाया चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाविषयीची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत.
चंद्रग्रहण कालावधी?
या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 18 मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहण सकाळी 8:44 पासून सुरू होणार आहे आणि दुपारी 1:20 पर्यंत हे चंद्रग्रहण राहणार आहे.
भारतात चंद्रग्रहण कधी? सुतक काळ कधी?
भारतात 5 मे रोजी (India) चंद्रग्रहण दिसणार आहे. यामध्ये चंद्राचा कोणताही भाग कापलेला दिसणार नाही. त्यामुळेच याला चंद्रग्रहण म्हणण्याऐवजी छाया चंद्रग्रहण म्हटलं जात आहे. पेनम्ब्रल चंद्रग्रहणाबाबत शास्त्रात सांगण्यात आलं आहे की यामध्ये चंद्राचा मार्ग फक्त मलिन असतो म्हणजेच चंद्राचा रंग मलिन होतो. यामुळेच 5 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणात सुतक कालावधीचा विचार केला जाणार नाही.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. भारताशिवाय युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागराच्या काही भागात दिसणार आहे.
पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा ग्रहण होतं तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो, त्याला चंद्र मालिन म्हणतात. इंग्रजीत त्याला (पेनम्ब्रा) म्हणतात. यानंतर चंद्र पृथ्वीच्या खऱ्या सावलीत प्रवेश करतो. जेव्हा हे घडतं तेव्हा प्रत्यक्ष ग्रहण होते. मात्र, कधी कधी चंद्र उंबरात प्रवेश करतो आणि उंब्रा शंकूतूनच बाहेर पडतो आणि पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करत नाही. त्यामुळेच पेनम्ब्रल चंद्रग्रहणात चंद्राची प्रतिमा फक्त अस्पष्ट असते आणि पूर्णपणे काळी नसते. त्यामुळेच याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण म्हणतात.