तिलक-हार्दिकने केली झिम्बाब्वेची धुलाई (फोटो- ट्विटर)
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
झिम्बाब्वेला दिले तब्बल 257 धावांचे लक्ष्य
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारताला मोठा विजय आवश्यक
T20 World Cup 2026: सध्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा शेवटचा टप्प्यातील सामने सुरू आहेत. सुपर 8 मध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे. आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात महत्वाचा सामना सुरू आहे. झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने झिम्बाब्वेला 257 धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने अक्षरश: झिम्बाब्वेच्या गोलदाजांची धुलाई केली आहे.
शेवटच्या काही ओव्हर्समध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने मोठे फटके मरून भारताला बलढ्या धावसंख्या उभरण्यास हातभार लावला. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक मोठा स्कोअर करण्याचा रेकॉर्ड आता भारताने केला आहे. याआधीच मोठा स्कोअर हा 245 होता. जो वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्ध केला होता. मात्र आज भारताने 256 धावा करून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माने 31 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. हार्दिकने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. तर तिलक वर्माने 16 चेंडूत 44 धावा केल्या. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी देखील चांगली खेळी केली.






