Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra
दोन्ही फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये 6.9 इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे, जो 1-120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मात्र S26 Ultra मध्ये नवीन प्रायव्हसी डिस्प्ले फीचर देण्यात आले आहे, जे S25 Ultra मध्ये उपलब्ध नव्हते.
iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?
डिझाइनच्या बाबतीत S26 Ultra अधिक रिफाइन्ड करण्यात आला आहे. तो S25 Ultra पेक्षा 0.3 मिमी पातळ आणि 4 ग्रॅमने हलका आहे. तसेच त्याचे कॉर्नर्स अधिक राऊंड करण्यात आले आहेत.
S25 Ultra मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला होता. तर S26 Ultra मध्ये कंपनीने त्याचा अपग्रेडेड Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला आहे, जो अधिक वेगवान आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे.
नवीन मॉडेलमध्ये S25 Ultra च्या तुलनेत 19 टक्के अधिक सक्षम CPU आणि 24 टक्के अधिक सक्षम GPU देण्यात आला आहे. तसेच फोन ओव्हरहीट होऊ नये यासाठी सुधारित व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.
S26 Ultra मध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड आणि 50MP + 10MP टेलिफोटो लेन्स सेटअप देण्यात आला आहे. पेपरवर हा सेटअप S25 Ultra सारखाच दिसतो. मात्र S26 Ultra मध्ये अपर्चर अधिक वाइड करण्यात आले आहे, ज्यामुळे कमी प्रकाशातही अधिक चांगले फोटो मिळतात. याशिवाय नाईटोग्राफी व्हिडिओ फीचरमध्येही सुधारणा करण्यात आले आहे.
दोन्ही मॉडेल्समध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. मात्र S26 Ultra मध्ये चार्जिंग स्पीड वाढवण्यात आली आहे. S25 Ultra 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करत होता, तर S26 Ultra आता 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 30 मिनिटांत सुमारे 75 टक्के चार्ज होऊ शकतो. तसेच वायरलेस चार्जिंगमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?
भारतामध्ये S26 Ultra ची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये आहे. तर S25 Ultra लाँचवेळी 1,29,999 रुपयांत उपलब्ध होता. सध्या S25 Ultra विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुमारे 20,000 ते 25,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.
जर तुम्हाला अधिक चांगला प्रायव्हसी डिस्प्ले, सुधारित परफॉर्मन्स आणि फास्ट चार्जिंग हवी असेल, तर S26 Ultra हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र S25 Ultra आधीपासून वापरत असाल, तर अपग्रेड हा तुमच्या गरजांवर अवलंबून असेल.






