Lungs: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू
Lungs Cancer: भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढता तणाव आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आजार झपाट्याने वाढतात. पॅसिव्ह स्मोकिंग, वायुप्रदूषण आणि कामाच्या ठिकाणी रसायनांच्या संपर्कामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही, पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. सतत खोकला, थुंकीतून रक्त पडणे, विनाकारण वजन कमी होणे, छातीत अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)
बिडी ओढणे, सिगारेटच्या धुरात पॅसिव्ह स्मोकिंग करणे, स्वयंपाकातील धूर आणि हवेतील प्रदूषकांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू लागतो. याशिवाय तंबाखू किंवा कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा फुफ्फुसांच्या कॅन्सरची लागण होऊ शकते. याशिवाय अनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करता कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना फुफ्फुसांच्या कॅन्सरची लागण होऊ शकते.
सततचा खोकला, जुन्या धुम्रपान करणाऱ्यांच्या खोकल्यामध्ये बदल होणे, विनाकारण थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नये. कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात अतिशय सामान्य पण शरीरासाठी घातक असलेली लक्षणे दिसू लागतात. पण कामाच्या धावपळीमध्ये या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. थुंकीतून रक्त पडणे, विनाकारण वजन कमी होणे, छातीत अस्वस्थता जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. यामुळे कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
विषारी हवा आणि प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करावे.
वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे.
संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली असणे फार आवश्यक आहे.
श्वसनाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ans: सतत खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे आणि विनाकारण वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात.सतत खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे आणि विनाकारण वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात.
Ans: होय. दीर्घकाळ खोकला राहणे किंवा आधीपासून असलेल्या खोकल्यामध्ये बदल होणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक संभाव्य लक्षण असू शकते.
Ans: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धोका अधिक असतो. तसेच अप्रत्यक्ष धूम्रपान, वायुप्रदूषण, रेडॉन वायू आणि काही व्यावसायिक रसायनांच्या संपर्कामुळेही धोका वाढू शकतो.






