हेअर स्टाईल करून कोरडे झालेले केस पुन्हा चमकदार करण्यासाठी माधुरी दीक्षितने सांगितले सोपे उपाय
केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शॅम्पू, हेअरमास्क, हेअर ऑइल इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे,केस सतत गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांना स्टयलिश लुक देण्यासाठी महिला केसांवर वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणे किंवा वेगवेगळ्या हिटिंग टूल्स आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)
केसांवर हीटिंग टूल्स, स्प्रे इत्यादी अनेक गोष्टींचा वापर वारंवार केल्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. यामुळे केस रुक्ष होणे, केस कोरडे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. वारंवार केसांवर कोणत्याही हीटिंग टूल्सचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता आणि केसांची पोत पूर्णपणे खराब होऊन जाते. केसांची गुणवत्ता बिघडल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला वारंवार काहींना काही उपाय करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी माधुरी दीक्षितने सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारेल आणि केस मऊ होतील.
केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते. याशिवाय नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी केल्यास केस अतिशय सुंदर आणि चमकदार होतील. दह्याच्या वापरामुळे केस सॉफ्ट होऊन केसांमधील कोड कमी होईल. तसेच केसांसाठी नियमित हीटिंग टूल्स वापरू नये.