(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या वातावरणानुसार आपल्या केसांच्या आरोग्यात बदल होणे सामान्य आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस खराब होऊ लागतात. यामुळे कमी वेळातच आपले काळे केस पांढरे पडू लागतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसजसे माणसाचे वय वाढू लागते तसतसे त्याचे काळे केस कालांतराने पांढरे होऊ लागतात. मात्र जर वय कमी असेल आणि तरीही जर तुमचे केस पांढरे होऊ लागले तर ते त्रासाचे कारण बनू शकते. आनुवंशिकतेव्यतिरिक्त, लहान वयात केस पांढरे होणे हे आहारातील पोषक तत्वांचा अभाव, रासायनिक उत्पादनांचा वापर आणि सूर्यप्रकाशाचा प्रभाव या कारणांमुळे देखील घडू शकते.
अनेकदा केस काळे करण्यासाठी लोक बाजारातील पर्यायांचा अवलंब करतात मात्र बाजारातील प्रोडक्ट्समध्ये अनेक रासायनिक घटक मिसळलेले असतात जे आपल्या केसांना हानी पोहचवू शकतात, यामुळे आपले केस डॅमेज होऊ शकतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी आजीच्या बटव्यातील आजींच्या काही सोपे आणि प्रभावी असे उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचे पांढरे केस काळे करू शकता. पूर्वीच्या काळापासून केसांची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. खोबरेल तेलामध्ये फायदेशीर लॉरिक ॲसिड असते ज्यामुळे केसांना फायदा होतो. जर काही केस पांढरे असतील तर त्यांच्यावर केसांचा रंग लावणे कठीण आहे. त्याच वेळी, हेअर डाईमध्ये केमिकल असतात जे केसांना हानी पोहोचवू शकतात. अशा स्थितीत घरातील काही नैसर्गिक घटक खोबरेल तेलात मिसळून केसांना लावणे फायद्याचे आणि सोईचे ठरेल.
नारळाचे तेल आणि आवळा
खोबरेल तेलात आवळा मिसळून केसांना नियमित याने मसाज केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते. यासाठी दोन चमचे खोबरेल तेल हलके गरम करून त्यात आवळा रस समान प्रमाणात टाका आणि मिक्स करा. त्यानंतर या तेलाने केसांना छान मसाज द्या. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावल्यानंतर एक ते दोन तासांनी डोके धुता येते. खोबरेल तेल आणि आवळ्यापासून बनवलेला हेअर मास्कही केसांवर लावला जातो. हेअर मास्क बनवण्यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून पातळ मास्क तयार करा. संपूर्ण डोक्यावर लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर केस पाण्याने धुवून स्वच्छ करा.
पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीचा वापर करून बनवा खोबऱ्याचे तेल, त्वचा आणि केसांना होतील अद्भुत फायदे
नारळाचे तेल आणि कांदा
तुम्ही नारळ तेलात कांदा मिसळून देखील तुमच्या केसांना काळे करू शकता. यासाठी कांद्याची अतिशय पातळ पेस्ट तयार करा आणि त्यात खोबरेल तेल टाकून मिसळा, मग ते थोडा वेळ शिजवा. यानंतर हे तेल डोक्याला मुळापासून टोकापर्यंत लावा आणि केसांवर काही वेळ राहू द्या. हे तयार तेल केसांना चांगल्या प्रमाणात सल्फर प्रदान करते जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
नारळाचे तेल आणि कढीपत्ता
कढीपत्ता औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून आयुर्वेदातही त्याचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत खोबरेल तेल आणि कढीपत्ता एकत्र मिसळून डोक्याला लावू शकता. यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल आणि कडीपत्ता घेऊन ते मंद आचेवर काहीवेळ शिजवा. कढीपत्ता शिजल्यावर तेल काळे पडेल. आता हे तयार तेल केसांना लावून मसाज करा आणि काही तासांनी केस पाण्याने स्वछ धुवा.