साहित्य एक कप मखाना उकडून घेतलेला बटाटा बारीक चिरून घेतलेली मिरची शेंगदाणे बडीशेप कोथिंबीर चाट मसाला गरम मसाला लाल तिखट मीठ तूप तेल कृती सर्वप्रथम एका भांड्यात तूप गरम करून घ्या त्यात मखाना चांगले भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर मखानाला चांगले मिक्सरमधून वाटून घ्या. आता एका बाऊलमध्ये उकडून घेतलेला बटाटा चांगले कुस्कुरून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मखाना टाका. हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या. त्यात हिरवी मिरची, बडीशेप, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला तेल लावून चांगले कटलेट तयार करा. एकीकडे गॅसवर कढई गरम करा, त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हे कटलेट टाका. मध्यम आचेवर हे कटलेट सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे आपले मखानाचे क्रिस्पी कटलेट तयार.