
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))
जळगाव शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिकेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, उपलब्ध निधीचे सर्वांना समान वाटप करून महापालिकेचा कारभार व्यवस्थित चालवावा, अशा सूचनाही त्यांनी सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवकांना दिल्या. मेहरूण येथील जुन्या टीबी सेंटर परिसरात उभारण्यात आलेल्या अद्ययावत कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आयटीआयजवळील कचरा रॅम्पमुळे विद्यार्थी आणि परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. Jalgaon News:
हा प्रश्न महापौर दीपमाला काळे यांच्या प्रभाग क्रमांक सातमधील असल्याने त्यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि अभाविप आंदोलनाची दखल घेतली. महापौर व उपमहापौर यांनी महिनाभरात रॅम्प हलविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरूवारी मेहरूण येथील प्रभाग समिती कार्यालयाजवळ स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत उभारलेल्या ट्रान्सफर स्टेशनचा शुभारंभ करण्यात आला. आयटीआयजवळील रॅम्प बंद करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आणि महिला बालकल्याण समिती सभापती सिंधू कोल्हे उपस्थित होते.
Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून महासभेत भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये झालेल्या वादाचा संदर्भ देत पालकमंत्री पाटील यांनी समान निधीवाटपाचे निर्देश दिले. निधीवाटपाबाबत शिवसेनेसह भाजपच्या काही पदाधिकाऱ्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले, सर्वांना समान निधी मिळाला पाहिजे आणि महापालिकेचा कारभार सुरळीत चालला पाहिजे, असे ते म्हणाले. शहरात आणखी कचरा संकलन केंद्रे उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
खासदार स्मिता वाघ यांनी केंद्राच्या योजनांमधून शहराच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेला अधिक निधी मिळवून देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.
महापौर काळे यांनी पाठपुराव्यामुळे नवीन केंद्र उभारल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे सांगितले. यावेळी भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयकुमार सोनवणे यांनी केले, तर उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी आभार मानले.
Ans: मेहरूण येथील जुन्या टीबी सेंटर परिसरात, प्रभाग समिती कार्यालयाजवळ हे स्टेशन सुरू करण्यात आले.
Ans: कचरा रॅम्पमुळे विद्यार्थी आणि परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तो बंद करण्यात आला.
Ans: अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या भागांत आगीच्या घटनांवेळी तातडीने पोहोचून आग नियंत्रणात आणण्यास आणि जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे.