५ मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा थंडगार 'चिया मँगो स्मूदी
राज्यासह संपूर्ण देशभरात कडक उन्हाळा वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. कारण या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा इत्यादी समस्या वाढू लागतात. अशावेळी आहारात चिया सीड्सचे सेवन करावे. चिया सीड्स आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. चिया सीड्स खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधरण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिया मँगो स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आंबे उपलब्ध असतात. आंब्यांपासून आमरस, आईस क्रीम इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया चिया मँगो स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक बीट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी