तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीट सँडविच
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला आवडत नाही. बीटचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीट खावे. आठवडाभर नियमित बीटचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा वजन कमी करताना अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात, पण असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी