Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

डोळ्यांचे विकार किंवा मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात आवळा गाजरच्या चटणीचे सेवन करावे. या चटणीचा समावेश केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 11:34 AM
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. याशिवाय जेवणात कायमच कोशिंबीर, चटणी, पापड किंवा लोणचं आवर्जून खाल्ले जाते. खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी, तिळाची चटणी इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला आवळा गाजरची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दैनंदिन आहारात आवळा गाजरचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केस आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. दैनंदिन आहारात आवळा गाजर चटणीचे सेवन केल्यास कमी रक्तदाब, रक्ताची कमतरता, डोळ्यांचे विकार आणि रोगप्रतिकारशक्ती यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ही चटणी फायदेशीर ठरते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी आवळा गाजरच्या चटणीचे सेवन करावे. ही चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

बाजारातली थंड पेय पिणे कायमचे जाल विसरून! शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • आवळा
  • गाजर
  • उडीद डाळ
  • चणा डाळ
  • हिरवी मिरची
  • लाल सुक्या मिरच्या
  • लसूण
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • तेल
  • कांदा
  • चिंच
  • कोथिंबीर
  • मीठ
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट

कृती:

  • आवळा गाजरची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळा आणि गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर गाजरची साल काढून घ्या.
  • आवळा गाजरचे बारीक तुकडे करून घ्या. यामुळे व्यवस्थित बारीक पेस्ट तयार होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात उडीद डाळ, चणा डाळ भाजून घ्या. लालसर झाल्यानंतर त्यात चिरलेली मिरची, लाल मिरची, लसूण पाकळ्या, कांदा, आवळा, गाजर घालून एक वाफ काढून शिजवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य कोथिंबीर आणि चिंच, ओल्या खोबऱ्याचा किस घालून चटणी बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून वाटा. तयार केलेली चटणी भाकरी किंवा चपातीसोबत चांगली लागते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आवळा गाजरची चटणी.

Web Title: Make amla carrot chutney to your meals to compensate for blood deficiency eye disorders will be removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • amla benefits
  • carrots
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी
2

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.