Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स होतील कायमचे गायब! वाटीभर बेसनाचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री नैसर्गिक साबण

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही साबणाचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून साबण तयार करावा. जाणून घ्या बेसनाचा वापर करून साबण बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2025 | 09:51 AM
वाटीभर बेसनाचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री नैसर्गिक साबण

वाटीभर बेसनाचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री नैसर्गिक साबण

Follow Us
Follow Us:

जेवणातील चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. बेसनपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.बेसन आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. पूर्वीच्या काळापासून बेसनाचा वापर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मोठे फोड घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच अनेक महागड्या क्रीमसुद्धा वापरल्या जातात. पण नेहमीच हानिकारक रसायनांपासून बनवलेल्या क्रीम्सचा वापर कारण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. यामुळे त्वचेवर नैसगरिक चमक येते.(फोटो सौजन्य – pinterest)

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने लावा बेसन आणि दही, त्वचा राहील कायमच तरुण

बेसनाच्या पिठाचा वापर करून तुम्ही घरगुती फेसपॅक, फेसमास्क, स्क्रब इत्यादी अनेक उपाय केले जातात. सर्वच घरांमध्ये बेसन उपलब्ध असते. बेसनमध्ये आढळून येणारे घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील चमक वाढवतात. यामध्ये असलेले नैसर्गिक क्लिन्झिंग गुणधर्म त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून केमिकल फ्री नैसर्गिक साबण तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा साबण नियमित तुम्ही अंघोळीसाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

साबण तयार करण्यासाठी साहित्य:

  • बेसन
  • आंबेहळद
  • गुलाबपाणी
  • बदाम तेल
  • कोरफड जेल
  • ग्लिसरीन
  • विटामिन ई कँप्सूल
  • साबण बेस
Skin allergies in monsoon: पावसाळ्यात त्वचेस होणारे धोके आणि त्यावरील सोपे उपाय

कृती:

बेसनाचा साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात आंबेहळद, गुलाबपाणी, बदामाचे तेल, कोरफड जेल, ग्लिसरीन, विटामीन ई कॅप्सूल्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नका. मोठ्या भांड्यात सोप बेस घेऊन वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेली बेसन पेस्ट घालून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साबण बनवण्यासाठी वाटीमध्ये मिश्रण ओता. पाच किंवा सहा तास ठेवून घ्या. साबण मोल्ड किंवा वाटीमध्ये ठेवलेले साबण काढून घ्या. हा साबण तुम्ही अंघोळीसाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make chemical free natural soap at home using a bowl of besana home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.