चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने लावा बेसन आणि दही
पूर्वीच्या काळापासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेसनाचा वापर केला जात आहे. बेसन आणि दह्याचे मिश्रण नियमित आठवडाभर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होण्यास मदत होईल. हल्ली वाढलेले प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा तेलकट होते. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे किंवा त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – istock)
Skin allergies in monsoon: पावसाळ्यात त्वचेस होणारे धोके आणि त्यावरील सोपे उपाय
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बेसन आणि दह्याचा वापर करू शकता. दही त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. बेसनामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय दह्यामध्ये लॅक्टिव अॅसिड आढळून येते. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स किंवा त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. बेसन आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या, बारीक रेषा किंवा त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
बेसन दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ ठेवून त्वचा नंतर पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय केल्यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल. त्वचेवरील डाग, चट्टे दूर कमी करण्यासाठी बेसन गुणकारी आहे. बेसन दह्याचा फेसपॅक त्वचेवर 20 मिनिटं ठेवावा. यामुळे त्वचा कायम सुंदर आणि चमकदार राहते.
हळदीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेवर वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात. मोठ्या वाटीमध्ये बेसन, दही आणि चिमूटभर हळद घेऊन व्यवस्थित पेस्ट मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून 20 मिनिट तसेच ठेवून घ्या. त्यानंतर हाताना थोडस पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी हळद अतिशय प्रभावी ठरते.