Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम चिकन सूप, सर्दी खोकला होईल गायब

हिवाळ्यात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरी सूप बनवले जाते. पण भाज्यांचे सूप खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थाचा वापर करून बनवलेले सूप खाण्याची इच्छा होते. अशावेळी चिकन सूप बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2024 | 11:40 AM
चिकन सूप बनवण्याची रेसिपी

चिकन सूप बनवण्याची रेसिपी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहरेच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्यात सर्वच घरांमध्ये चिकन बनवले जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप आवडत. चिकनपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन आणि इतर पोषक घटक आढळून येतात, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हिवाळ्यात सतत होणारी सर्दी आणि खोकला थांबवण्यासाठी चिकन सूपचे सेवन करावे. या सूपचे सेवन केल्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी चिकनच्या सूपचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही पद्धतीमध्ये चिकन सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे सूप कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • चिकन
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरव्या मिरच्या
  • काळीमिरी पावडर
  • तेल किंवा तूप
  • मीठ
  • कोथिंबीर
  • कांदा
  • धणे पावडर
  • लिंबाचा रस
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • चिकन सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकन बारीक कापून व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर टोप गरम करायला ठेवून त्यात तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात बारीक चिरून घेतलेले आलं लसूणचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करून खडा मसाला टाका.
  • त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्या.
  • कांदा लाल झाल्यानंतर त्यात धणे पावडर आणि हळद टाकून मिक्स करा.
  • स्वच्छ धुवून घेतलेले चिकन टाकून मिक्स करा आणि काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • चिकनमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी येण्यासाठी ठेवा. उकळी आल्यानंतर वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिकन सूप.

Web Title: Make hot chicken soup at home in an easy way during winters soup recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • cooking tips
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
1

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
3

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
4

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.