
फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
Salad Recipe: सकाळच्या नाश्त्यात कायसच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त ईच्छा होते. अशावेळी नाश्त्यात तुम्ही हाय-प्रोटीन सॅलड बनवून खाऊ शकता. कायमच तेलकट, तिखट पदार्थ खाण्याऐवजी नाश्त्यात हेल्दी टेस्टी भाज्यांचा समावेश करावा. सॅलड हा आहारातील खूप पौष्टिक आणि हलका पदार्थ आहे. पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि अंकुरित धान्ये इत्यादींचा वापर करुन सॅलड बनवले जाते. भाज्यांमध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला पोषण देतात. पचनक्रिया सुरळित चालू ठेवण्यासाठी आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भाज्यांचे सेवन करावे. सॅलड खाल्यामुळे वजन नियत्रंणात राहण्याम मदत होते. चला तर जाणून घेऊया हाय-प्रोटीन सॅलड बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)