
तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
Coconut Halwa Recipe: सण- उत्सवाच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. लाडू, खीर, शिरा, गुलाबजाम, रस्सगुला इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने ‘थेन्गई थेराट्टीपाल’ म्हणजेच कोकोनट हलवा सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. ओल्या खोबऱ्याचा किस, तूप आणि गूळाचा वापर करुन कोकोनट हलवा बनवू शकता. हा पदार्थ १० ते १५ मिनिटं बनवू शकता. तोंडात विरघळणारा शाही पदार्थ खाल्यानंतर घरातील सर्वच तुमचे कौतुक करतील. सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात विविध गोड पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. सण- उत्सवाच्या दिवसांमध्ये विकतचे गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरात पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा बनवू शकता. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरात बनवलेले चवीसोबतच शरीरासाठी सुद्दा गुणकारी ठरतात. (फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स