उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी
उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? असे प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. कायमच साबुदाणा खिचडी, वडा, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी इत्यादी ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याच्या कुरकुरीत भजी बनवू शकता. घरात कायमच भजीचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. कांदाभजी, बटाटाभजी, टोमॅटोभजी, मिरची भजी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भजी बनवल्या जातात. पण तुम्ही साबुदाण्याचा वापर करूनसुद्धा भजी बनवू शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी साबुदाण्याची भजी नक्की बनवून पहा. घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साबुदाणा भजी खायला खूप जास्त आवडेल. जाणून घ्या साबुदाणा भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा
इटालियन पदार्थाला देसी टच, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मसालेदार ‘मॅक्रोनी पास्ता’