साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक
गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ आला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडे मोठी तयारी केली जात आहे. याशिवाय बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, रवा मोदक, गुलकंद मोदक इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोदक बनवले जात आहेत. पण आज आम्ही तुम्हाला साखरेत गुळाचा वापर न करता खजूर मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थांचे सेवन केले जाते. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे साखरेचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. खजूर खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया खजूर मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी