Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Macroni Salad Recipe : काही मिनिटांतच बनवा मॅकरोनी सॅलड , चव इतकी मजेदार की घरातील सर्वच होतील खुश

Macroni Salad Recipe : मॅकरोनी पास्ता तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण मॅकरोनी सॅलड तुम्ही कधी खाल्ला आहे का? याची चव चाखाल तर सॅलडचे फॅन होऊन जाल. हेल्दी पर्यायाच्या शोधात असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 02:56 PM
Macroni Salad Recipe : काही मिनिटांतच बनवा मॅकरोनी सलाड, चव इतकी मजेदार की घरातील सर्वच होतील खुश

Macroni Salad Recipe : काही मिनिटांतच बनवा मॅकरोनी सलाड, चव इतकी मजेदार की घरातील सर्वच होतील खुश

Follow Us
Close
Follow Us:
  • सॅलड तर अनेक प्रकरचे असतात.
  • तुम्ही कधी मॅकरोनी पास्ता खाल्ला आहे का?
  • याची रेसिपी फार झटपट आणि स्वादिष्ट चवीची आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत किंवा हलका, पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ हवा असेल तर मॅकरोनी सॅलड हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल लोक फास्ट फूडपेक्षा हेल्दी आणि होममेड पदार्थांकडे अधिक वळत आहेत. अशा वेळी मॅकरोनी सॅलड हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन मानले जाते. हा सॅलड बनवायला सोपा असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

मॅकरोनी ही पास्ताची एक लोकप्रिय प्रकार असून ती उकडून त्यात विविध ताज्या भाज्या, मेयोनीज, मसाले आणि हर्ब्स घालून सॅलड तयार केला जातो. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या बदलू शकतो, तसेच हेल्दी व्हर्जनसाठी कमी फॅट मेयोनीज किंवा दही वापरू शकतो. पार्टी, किटी पार्टी, लंच बॉक्स किंवा सायंकाळच्या स्नॅक्ससाठी मॅकरोनी सॅलड एकदम परफेक्ट असतो. विशेष म्हणजे हा सॅलड पोटासाठी हलका, पचायला सोपा आणि पोषणमूल्यांनी भरलेला असतो. थंड थंड सर्व्ह केल्यावर याची चव अजूनच वाढते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मॅकरोनी सॅलड कसा बनवायचा.

 साहित्य:

  • 1 कप मॅकरोनी
  • पाणी (उकडण्यासाठी)
  • 1/2 कप गाजर (बारीक चिरलेले)
  • 1/2 कप काकडी (बारीक चिरलेली)
  • 1/2 कप स्वीट कॉर्न
  • 1/4 कप कांदा (पर्यायी)
  • 1/2 कप मेयोनीज
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पूड
  • 1/2 टीस्पून चाट मसाला
  • थोडी कोथिंबीर (सजावटीसाठी)
कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात थोडे मीठ आणि मॅकरोनी घालून 8–10 मिनिटे उकडा.
  • मॅकरोनी शिजल्यावर गाळून घ्या आणि थंड पाण्याने धुवा.
  • एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेली मॅकरोनी घाला.
  • त्यात गाजर, काकडी, स्वीट कॉर्न आणि कांदा घाला.
  • आता मेयोनीज, लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी आणि चाट मसाला घालून नीट मिसळा.
  • चव तपासून आवश्यक असल्यास मसाले वाढवा.
  • वरून कोथिंबीर घालून सजवा.
  • सॅलड 15–20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यावर सर्व्ह करा.
  • हेल्दी पर्यायासाठी मेयोनीजऐवजी दही वापरू शकता.
  • उकडलेले बटाटे किंवा पास्ता भाज्या घालून चव वाढवता येते.

Web Title: Make macaroni salad in just a few minutes recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • salad tips

संबंधित बातम्या

कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ
1

कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’
2

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

चहा कॉफी पिणे कायमचे जाल विसरून! सकाळच्या नाश्त्यात प्या गरमागरम पौष्टिक कुळीथ सूप, सर्दी खोकल्यावर जबरदस्त उपाय
3

चहा कॉफी पिणे कायमचे जाल विसरून! सकाळच्या नाश्त्यात प्या गरमागरम पौष्टिक कुळीथ सूप, सर्दी खोकल्यावर जबरदस्त उपाय

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’
4

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.