Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार

Tandoori Naan Recipe : तव्यात तयार केलेला हा बटर नान चवीला अगदी हॉटेलसारखाच, किंबहुना अधिक स्वादिष्ट लागतो. घरच्या घरी सहज बनणारी ही रेसिपी खास मेजवानीवेळी परफेक्ट पर्याय ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 15, 2025 | 09:45 AM
रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, पॅनवरच होईल तयार

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, पॅनवरच होईल तयार

Follow Us
Close
Follow Us:
  • हॉटेलमध्ये जाताच आवर्जून मागवला जाणारा पदार्थ म्हणजे तंदुरी नान
  • हा नान तंदूरमध्ये तयार केला जातो
  • पण तुम्ही सोप्या ट्रिकने पॅनवरच लज्जतदार आणि मऊ तंदुरी नान तयार करू शकता
भारतीय भोजनातील नान ही एक अशी डिश आहे जी पाहताक्षणीच हॉटेलची आठवण करून देते. गरमागरम पनीर, दाल मखनी किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर नान मिळालं की जेवणाचा आनंद दुप्पट होतो. बहुतेकांना वाटतं की नान फक्त तंदूरमध्येच छान बनतं, पण घरच्या तव्यातही अगदी मऊ, फुललेलं आणि बटरचा सुवास दरवळणारं नान अप्रतिम तयार करता येतं. घरच्या घरी नान बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात आपण घटक ताजे ठेवू शकतो, आवडीनुसार बटर, साजूक तूप किंवा कोथिंबीर वापरू शकतो आणि हॉटेलपेक्षा अधिक ताजेपणा मिळवू शकतो.

हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट ‘रताळ्याचे पराठे’, अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

तव्यात नान बनवताना एक खास मजा असते,तंदूरसारखी उष्णता नसली तरी योग्य पद्धतीने शिजवलं तर नान अगदी मऊ आणि हलकं होतं. पीठात दही घालण्यामुळे त्याला छान आंबटपणा येतो आणि नान छान फुलून येतो. अनेकदा घरात अचानक पाहुणे आले किंवा काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी झटपट उपयोगी पडते. शिवाय, ज्यांच्याकडे ओव्हन किंवा तंदूर नाही त्यांच्यासाठी ही पद्धत म्हणजे एकदम परफेक्ट पर्याय.

साहित्य :

  • मैदा – 2 कप
  • दही – ¼ कप
  • साखर – १ टीस्पून
  • मीठ – ½ टीस्पून
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार (पीठ मळण्यासाठी)
  • बटर – लावण्यासाठी
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली (ऑप्शनल)
जेवणातील पदार्थांची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चांगले मिसळा. नंतर
  • त्यात दही आणि तेल घालून मऊसर पीठ मळा. आवश्यक वाटेल तितके पाणी घाला.
  • पीठावर झाकण ठेवून ते १ तास बाजूला ठेवा. या वेळेत पीठ छान मऊ व हलकं होते.
  • सेट झालेल्या पीठाचे समान आकाराचे गोळे करून घ्या आणि ५ मिनिटे झाकून ठेवा.
  • एक गोळा घेऊन लाटण्याने अंडाकृती किंवा पानाच्या आकाराचा लाटा. वरून थोडी कोथिंबीर दाबून लावू शकता.
  • तवा गरम करून नानाच्या एका बाजूला पाणी लावा. पाणी लावलेली बाजू तव्यावर चिकटवून ठेवा. त्यामुळे नान
  • तव्याला चिकटेल आणि फुलून येईल.
  • वरची बाजू फुलू लागली की तवा उलटा धरून नानची वरची बाजू थेट आचेवर भाजा. यामुळे तंदुरी नानसारखे छान तपकिरी ठिपके येतात.
  • तयार नान तव्यावरून उतरवून त्यावर मुबलक बटर लावा. गरमागरम नान पनीर बटर मसाला, दाल मखनी किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर सर्व्ह करा.

Web Title: Make restaurant like soft tandoori naan at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.