पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर
११ दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पितृ पक्षाला सुरुवात होते. पितृपक्षाला सुरुवात झाल्यानंतर अनेक घरांमध्ये पितरांची पूजा केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा नैवैद्य अर्पण केला जातो. नैवेद्याच्या स्वयंपाकात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. काही जण तांदळाची खीर अतिशय पातळ तर कधी अतिशय घट्ट खीर बनवली जाते. चुकीच्या पद्धतीने खीर बनवल्यास पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये दाटसर तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागेल आणि जास्त घट्ट किंवा पातळ सुद्धा होणार नाही. चला तर जाणून घेऊया तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी