गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना गिलके खायला आवडत नाही. गिलके पाहिल्यानंतर नाक मुरडतात. चवीला बेचव आणि गिळगिळीत भाजी कोणालाच खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत गिलके फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. गिलक्यांची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी किंवा भजी बनवली जाते. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गिलके फ्राय बनवू शकता. तुम्ही बनवलेली ही भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया झणझणीत गिलके फ्राय बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)