सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. शिमला मिरचीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण शिमला मिरची खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी ठरते. जेवणाच्या ताटात काहींना नेहमीच कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून बनवलेली चटणी लागते. जेवणात चटणी असेल तर दोन घास जास्त जातात. शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कढीपत्त्याची चटणी, टोमॅटोची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवलेल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.हा पदार्थ तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. घाईगडबडीमध्ये भाजी काय बनवावी? हे सुचत नाही. अशावेळी शिमला मिरचीची चटणी तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
एकादशी स्पेशल नाश्ता! उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे
नावडती भाजीही होईल आवडीची; एकदा बनवून तर पहा भरलेली भेंडी