
१० मिनिटांत कुकरमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. तसेच दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अनेकांना पावभाजी बनवणे खूप जास्त कठीण वाटते. कारण पावभाजी बनवण्यासाठी भाजी निवडा, कुकरमधून शिजवून घ्या, त्यानंतर भाजीला पुन्हा एकदा फोडणी द्यावी लागतो. त्यामुळे खूप जास्त वेळ लागतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणातील पदार्थांमध्ये प्रत्येकाला झटपट तयार होणारे पदार्थ हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुकरमध्ये १० मिनिटांत पावभाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पावभाजी खायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही झटपट या पद्धतीने पावभाजी बनवू शकता. वन पॉट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. एकाच भांड्यात पदार्थ शिजवल्यामुळे जास्त पसारा होत नाही. चला तर जाणून घेऊया वन पॉट पावभावी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)