जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग कढीपत्त्याची चटणी
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. कढीपत्ता चवीसोबतच संपूर्ण शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.कढीपत्त्याची फोडणी जेवणाला दिल्यास चव वाढण्यासोबतच सुंगध सुद्धा वाढतो. त्यामुळे जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. लहान मुलं जेवणात टाकलेला कढीपत्ता काढून बाहेर ठेवतात. कढीपत्ता खायला आवडत नाही. पण असे न करता जेवणातील कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय महिनाभर नियमित कढीपत्त्याच्या पानांची चटणी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबत केसांची सुद्धा झपाट्याने वाढ होईल. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता वरदान मानला जातो. त्यामुळे नियमित जेवणात कढीपत्त्याच्या पानांची चटणी खावी. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






