बाळंतीणीसाठी सकाळच्या नाश्त्यात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा बाजरीच्या पिठाची पेज
महाराष्ट्रात बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. त्यातील अतिशय पौष्टिक धान्य म्हणजे बाजरी. जेवणातील पदार्थांमध्ये बाजरीची भाकरी किंवा मिक्स धान्यांची भाजी कायमच खाल्ली जाते. बाजरीचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. यामध्ये झिंक, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होते आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. बाजरीपासून बनवलेले पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला द्यावेत. बाळंतीणीसाठी बाजरी हा पदार्थ गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पिठाचा वापर करून पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भूक लागल्यानंतर इतर कोणतेही तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी बाजरीच्या पिठाची पेज बनवून प्यावी. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. विविध राज्यांमध्ये बाजरीच्या पेजला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






