दुधाचा वापर न करता झटपट बनवा गोड शेवया
श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांमध्ये घरात नेहमीच शाहाकारी आणि गोड पदार्थ बनवले जातात. तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. शंकराची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यामध्ये नेहमीच शिरा, खीर किंवा मिठाई ठेवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला दुधाचा वापर न करता झटपट गोड शेवया बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. प्रामुख्याने शेवया बनवताना त्यात हिरवी मिरची, कांडा आणि इतर साहित्यांचा वापर करून तिखट शेवया बनवल्या जातात. सकाळच्या नाश्त्यात अजूनही बऱ्याच घरांमध्ये तिखट शेवया खाल्ल्या जातात. सकाळच्या घाईगडबडीमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना खूप जास्त घाई होते. अशावेळी शेवया हा उत्तम पर्याय आहे. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात शेवया तयार होतात. चला तर जाणून घेऊया गोड शेवया बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ