सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
रात्रीच्या जेवणात चपात्या जास्त झाल्यानंतर त्या सकाळी उठून चहा सोबत खाल्ल्या जातात. पण चहासोबत चपाती खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेक लोक चहासोबत चपातीचे सेवन करणे टाळतात. तसेच बऱ्याचदा रात्री बनवलेल्या चपात्या अतिशय कडक आणि वातड होतात. कडक झालेल्या चपात्या कोणालाच खायला आवडत नाही. त्यामुळे चपात्या फेकून दिल्या जातात. मात्र रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झणझणीत चपातीचा चुरा बनवू शकता. हा पदार्थ खाल्यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. तसेच हा पदार्थ ताज्या बनवलेल्या चपातीपासून सुद्धा बनवता येईल. चपतीभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी चपातीचा चुरा बनवून तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया चपातीचा चुरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
गटारी होईल आणखीनच स्पेशल! भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय
उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊसर इडली, नोट करून घ्या पदार्थ