Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी

कारलं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक असतं. मात्र याची कडू चव अनेकांना आवडत नाही अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून भरलेलं कारलं तयार करू शकता. हे फारस कडू नसून चवीला अप्रतिम लागतं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 25, 2025 | 08:15 PM
कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी

कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी

Follow Us
Follow Us:

कारलं ही एक अशी भाजी आहे, जी लहानांनाच काय तर मोठ्यांनाही खायला फारशी आवडत नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी कारल्याची एक भन्नाट आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. पारंपरिक पद्धतीने तयार केली जाणारी कारल्याची ही रेसिपी तुम्ही कारल्याच्या प्रेमात पडण्यास भाग पडेल. कारलं आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं असत, यात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात आणि आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात.

पावसाच्या थंड वातावरणात घरी बनवा गरमा गरम स्ट्रीट स्टाइल Chicken Momos

कारल्याची कडू भाजी खायला आवडत नसल्यास तुम्ही यापासून मसालेदार आणि चविष्ट असं भरलेलं कारलं तयार करू शकता. ही एक पारंपरिक डिश आहे जी जुन्या काळापासून तयार केली जात आहे. आजही अनेकांच्या घरी हा पदार्थ बनवला जातो मात्र तुम्हाला याची रेसिपी माहिती नसल्यास हा लेख तुमच्या कामी येईल. स्टफ्ड कारलं चवीला तर चांगलं लागतंच शिवाय हे बनवणंही फार सोपं आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मध्यम आकाराची कारली – ५-६
  • कांदा – २ मध्यम, बारीक चिरलेला
  • लसूण – ५-६ पाकळ्या (बारीक केलेले)
  • आले – १/२ इंचाचा तुकडा (बारीक केलेले)
  • शेंगदाण्याचे कूट – २ टेबलस्पून
  • सुकं खोबरं – २ टेबलस्पून
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • धणे पूड – १ टीस्पून
  • जिरे पूड – १/२ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • तिखट – १ टीस्पून (चवीनुसार)
  • मीठ – चवीनुसार
  • चिंच-गूळ पाण्याचा कोळ – २ टेबलस्पून
  • तेल – ३-४ टेबलस्पून
नेहमीचे कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पोह्यांचे चविष्ट कटलेट

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कारली सोलून त्याला उभी चीर द्या आणि बिया काढा
  • त्यावर मीठ लावून ३०-४० मिनिटे ठेवा
  • नंतर पाण्यात धुऊन हलकं उकळून घ्या किंवा पाण्यात चांगलं निथळा
  • कढईत १-२ टेबलस्पून तेल गरम करा
  • त्यात लसूण, आले आणि कांदा परतवा
  • कांदा खरपूस झाल्यावर त्यात धणे पूड, जिरे पूड, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला टाका
  • नंतर शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि चिंच-गूळ कोळ टाकून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्या
  • गॅस बंद करून मसाला थोडा थंड होऊ द्या
  • तयार मसाला प्रत्येक कारल्यात भरून घ्या
  • कढईत थोडं तेल गरम करून कारल्या मंद आचेवर झाकण ठेवून परता
  • मधून मधून परतत रहा जेणेकरून सर्व बाजूंनी खरपूस भाजल्या जातील
  • १०-१५ मिनिटांनी तुमचं भरलेलं कारलं तयार होईल
  • भरलेल्या कारल्यासोबत पोळी, पराठा किंवा भाताबरोबर खाल्ल्यास अधिक चवदार लागतात
  • कडवटपणा अजून कमी करायचा असल्यास कारल्याच्या सोललेल्या सालींचाही उपयोग मसाल्यात करू शकता

Web Title: Make tasty and less bitter stuffed bitter gourd at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.