Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

Bhendi Do Pyaja Recipe : तीच तीच नेहमीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे का? मग एकदा नक्की घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल भेंडी दो प्याजा. ही डिश नेहमीच्या बोरिंग भाजीला मजेदार बनवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 09:23 AM
Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'भेंडी दो प्याजा', झटपट आहे रेसिपी

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'भेंडी दो प्याजा', झटपट आहे रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • नेहमीची भेंडीची भाजी कंटाळवाणी वाटते.
  • तुम्ही कधी भेंडी दो प्याजा डिश ट्राय केली आहे का?
  • ही रेसिपी एकदा नक्की घरी बनवून पाहा.
भारतीय स्वयंपाकात भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी मानली जाते. तिच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी भिंडी दो प्याजा हा उत्तर भारतीय शैलीतील अतिशय चविष्ट आणि सुगंधी पदार्थ आहे. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर प्रमाणात वापरलेला कांदा. भेंडी व्यवस्थित परतून तिचा चिकटपणा कमी केला जातो आणि त्यानंतर मसाले व कांद्याची जोड दिली जाते. त्यामुळे प्रत्येक घासात भेंडीची नैसर्गिक चव आणि कांद्याचा गोडसर स्वाद अनुभवायला मिळतो. ही भाजी दैनंदिन जेवणासाठी जितकी योग्य आहे, तितकीच पाहुणचारासाठी किंवा खास जेवणातही उठून दिसते. गरम चपाती, तंदुरी रोटी, पराठे किंवा साध्या वरण-भातासोबतही भिंडी दो प्याजा अप्रतिम लागते. कमी साहित्य, सोपी कृती आणि रेस्टॉरंटसारखी चव यामुळे ही रेसिपी प्रत्येकाने एकदा तरी नक्की ट्राय करायला हवी.

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

साहित्य

  • २५० ग्रॅम ताजी भेंडी
  • २ मोठे कांदे (एक लांब चिरलेला, एक पाकळ्यांमध्ये कापलेला)
  • २ टोमॅटो बारीक चिरलेले
  • २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून धणेपूड
  • १/२ टीस्पून जिरेपूड
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून आमचूर पावडर (ऑप्शनल)
  • १/२ टीस्पून जिरे
  • २ ते ३ टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • सजावटीसाठी कोथिंबीर
बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी

कृती

  • भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करा. नंतर तिचे मध्यम आकाराचे तुकडे करून बाजूला ठेवा.
  • कढईत थोडे तेल गरम करून भेंडी ७–८ मिनिटे मध्यम आचेवर परता. ती हलकी कुरकुरीत झाली की बाहेर काढून ठेवा.
  • त्याच कढईत उरलेले तेल गरम करून जिरे तडतडू द्या. त्यानंतर लांब चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
  • आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. मग हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत परता.
  • आता कांद्याच्या पाकळ्या घालून २–३ मिनिटे परता, जेणेकरून त्या किंचित मऊ होतील पण त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.
  • परतलेली भेंडी मसाल्यात घाला. गरम मसाला आणि आमचूर पावडर घालून सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा. ३–४ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • गॅस बंद करून वरून ताजी कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम भिंडी दो प्याजा फुलका, पराठा किंवा जिऱ्याच्या भातासोबत सर्व्ह करा.

Web Title: Make tasty restaurant style bhendi do pyaja at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
1

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
2

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.