Khar Vang Recipe : तुम्हालाही वांग्याची भाजी खायला आवडत नाही मग ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करायला हवी. गावाकडे खाऱ्या वांग्याची डिश खूप लोकप्रिय असून याची रेसिपी सोपी आहे.
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
खारं वांग हे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतील एक चविष्ट पदार्थ आहे.
गावाकडे ही भाजी अधिकतर खाल्ली जाते.
चला रेसिपी जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गावरान खार वांग हा एक अत्यंत चविष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मानला जातो. ताज्या लहान वांग्यांमध्ये मसालेदार खार भरून मंद आचेवर शिजवले की त्याची चव अधिक खुलून येते. ही भाजी गरम भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. पाहुणचार असो किंवा रोजच्या जेवणाचा बेत, गावरान खार वांग हा पदार्थ प्रत्येकाला आवडणारा ठरतो. कमी साहित्यामध्ये घरगुती पद्धतीने बनणारी ही रेसिपीएकदा करून पाहिल्यास तिची चव नक्कीच लक्षात राहील.