सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही हलका फुलका नाश्ता हवा असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे किंवा उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवू शकता. खाकरा हा गुजरातमधील पारंपरिक पदार्थ आहे. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून खाकरा बनवला जातो. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासुद्धा खाऊ शकता. कुरकुरीत, क्रिस्पी आणि खुसखुशीत खाकरा चहासोबत अतिशय सुंदर लागतो. पण कायमच बाजारातून विकत आणलेला खाकरा खाण्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये खाकरा बनवू शकता. बाजारात मिळणाऱ्या खाकऱ्यामध्ये मैद्याच्या पिठाचा सुद्धा वापर केला जातो. मैद्याचे पीठ जास्त प्रमाणात खाल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
पानी कम चाय, बन मस्का कप केक अन् खारी; इराण्यांकडचे सारेच पदार्थ भारी