Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रजोनिवृत्तीमधील संतुलन! काम व आरोग्य सांभाळण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात ‘या’ आवश्यक टीप्स

धावकपाळीच्या जीवनशैलीमुळे महिला आरोग्याकडे व्यवथित लक्ष देत नाहीत.यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2025 | 03:40 PM
काम व स्वास्थ्य सांभाळण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात 'या' अत्यावश्यक टीप्स

काम व स्वास्थ्य सांभाळण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात 'या' अत्यावश्यक टीप्स

Follow Us
Close
Follow Us:

वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. कधी शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन तर कधी शरीरसंबंधित उद्भवणाऱ्या अनेक गंभीर समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो.पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. असे केल्यामुळे शरीरसंबंधित उद्भवलेले छोटे आजार मोठे आणि गंभीर स्वरूप घेतात. त्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे.(फोटो सौजन्य – iStock)

World Tuberculosis Day: तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ खोकताय? टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

भारतामध्ये, स्त्रिया वयाच्या सुमारे 46.2 वर्षाच्या आसपास मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जातात. पाश्चात्य देशांतील 51 वर्षांच्या सरासरी वयाच्या तुलनेत भारतीय स्त्रियांमध्ये हा टप्पा लवकर येतो. या काळामध्ये स्त्रियांनी काम व वैयक्तिक आयुष्य यांतील संतुलन साधतानाच रजोनिवृत्तीची लक्षणे समजून घेणे व त्यांना हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अबॉट व इप्सोस यांनी घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये रजोनिवृत्तीचा स्त्रीच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे मत 87 टक्‍के लोकांनी व्यक्त केले. हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोप न लागणे, मूड्स बदलत राहणे आणि सांधे दुखणे यांसारखी लक्षणे हाताळायला कठीण वाटू शकतात. तरीही या प्रश्नाविषयी कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी, सहकाऱ्यांशी बोलणे अवघड वाटत असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळ-जवळ 80 टक्‍के महिलांनी सांगितले. या सर्वेक्षणामध्ये सात शहरांतील 1200 हून अधिक लोकांचे विचार नोंदवून घेण्यात आले. या विषयाबद्दल स्त्रियांमध्ये कितपत जागरुकता आहे, त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे व रजोनिवृत्तीदरम्यान त्या कोणत्या अनुभवांतून जातात याचा अंदाज घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. या सर्वेक्षणामध्ये 45-55 वर्षे वयोगटातील स्त्रिया तसेच कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.

रजोनिवृत्तीच्या लक्षणांमुळे नोकरीवरील आयुष्य आव्हानात्मक बनू शकते. सर्वेक्षणानुसार नोकरी करणाऱ्या स्त्रियांपैकी 80 टक्‍के स्त्रियांना एकाग्रता साधणे कठीण जाते, 73 टक्‍के स्त्रियाना वारंवार रजा घ्यावी लागते व 66 टक्‍के स्त्रियांना मनोवस्थेत मोठे चढउतार जाणवतात (मूड स्विंग्ज) आणि चिडचिडेपणा होतो असे दिसून आले. या समस्यांमुळे त्यांच्या उत्पादकतेवर, कामातून मिळणाऱ्या समाधानावर आणि करिअरमधील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी सांगतात, “रजोनिवृत्तीविषयी जागरुकता वाढविण्याचे काम हे केवळ काही तथ्यांची माहिती करून देण्यापुरते मर्यादित नसते. इथे स्त्रियांना आपला अनुभव सांगताना अवघडलेपणा वाटणार नाही असा एक अवकाश त्यांच्यासाठी निर्माण करणे गरजेचे असते. विमेन फर्स्ट ही वेबसाइट हा असाच एक मंच आहे, जो उपयुक्त माहिती पुरवितो व कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांशी खुल्या, अर्थपूर्ण संवादाला प्रोत्साहन देतो. या आधारामुळे स्त्रिया आपल्या आयुष्यातील पुढचा टप्पा आत्मविश्वासाने व सहजतेने स्वीकारण्यास सक्षम बनतात.”

शिंदे मेडिकेअर हॉस्पिटल, मुंबईच्या संचालक डॉ. वीणा शिंदे यांच्या मते, “रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आगळावेगळा अनुभव असतो, ज्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर आणि एकूणच जीवनमानाच्या दर्जावर होतो. सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे बदलाचा हा टप्पा सुलभतेने आणि अधिक आरामदायीपणे पार करता येऊ शकतो. नोकरदार महिलांसाठी ध्यानधारणेसाठी छोटासा ब्रेक घेणे, कितीही व्यग्र दिनक्रम असला तरीही संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायामासाठी आवर्जून वेळ काढणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांशी उपचारांच्या पर्यायांविषयी चर्चा करणेही महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या जीवनमानाच्या दर्जावर परिणाम करणाऱ्या लक्षणांना दूर करण्यामध्ये मदत होऊ शकते.”

रजोनिवृत्तीची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी व आपल्या आरोग्याची तसेच आपल्या करिअरची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी काही टिप्स

बोलत्या व्हा आणि गरज असेल तेव्हा मदत मागा:

आपल्या लक्षणांविषयी व त्यांचा तुमच्या कामावर कसा परिणाम होत आहे याविषयी आपल्या सहकाऱ्यांशी आणि सुपरवायझर्सशी बोला. तुम्ही कोणत्या स्थितीतून जात आहात याबद्दल मित्रमंडळींशी आणि कुटुंबाशी – किंवा आपल्या विश्वासू सहकाऱ्यांशीही चर्चा केल्याने तुम्हाला त्यांचे पाठबळ मिळू शकेल तसेच तुमची स्थिती जाणणाऱ्या व्यक्तींचे एक नेटवर्क तयार होऊ शकेल. कदाचित इतर कुणी अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेले असेल आणि त्यांनी हे प्रश्न कशाप्रकारे हाताळले हे तुम्हाला त्यांच्याकडून कळू शकेल.

कामाच्या ठिकाणी आधार देणारे वातावरण तयार करा:

कामाच्या ठिकाणी थोडेसे फेरफार केले तर लक्षणे हाताळणे तुलनेने सोपे जाऊ शकते. जसे की हॉट फ्लशेस किंवा अस्वस्थतेसाठी डेस्क फॅन जवळ बाळगणे किंवा कामाचे वेळापत्रक थोडे लवचिक बनविण्यासारख्या साध्यासोप्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.

स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या:

आपल्या कामाच्या वेळापत्रकामध्ये मनावरचा ताण कमी करणाऱ्या काही गोष्टींची भर टाका. मूड स्विंग्ज आणि थकवा हाताळण्यासाठी माइंडफुलनेस आणि शरीरावरचा ताण घालवणाऱ्या रिलॅक्सेशनच्या तंत्रांचा सराव करा व थोडा हलकाफुलका व्यायाम करा.

वैद्यकीय मदत घ्यावी:

आपल्या लक्षणांविषयी एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोला व उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा शोध घ्या. जीवनशैलीतील बदल आणि योग्य औषधोपचारांच्या मदतीने रजोनिवृत्तीच्या काळातील लक्षणे प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात.

आतडयांना आलेली सूज कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे करा सेवन, शरीराला होतील अद्भूत फायदे

विश्वासार्ह माहितीची उपलब्धता:

विमेन फर्स्ट पोर्टलसह अनेक वेगवेगळे स्त्रोत आहेत, जे तुम्हाला रजोनिवृत्तीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या व हाताळण्याच्या कामी मदत करू शकतात. तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न पडले असल्यास किंवा अधिक मार्गदर्शन हवे असल्यास डॉक्टरांशी सल्लामसलत करा. याखेरीज तुम्ही रजोनिवृत्तीचा काळ सुरू असलेल्या इतर महिलांशी संपर्क साधण्याचा पर्यायही आजमावू शकता. आधार गट, ऑनलाइन फोरम्स किंवा अगदी कामाच्या ठिकाणी तयार झालेले अऩौपचारिक नेटवर्क हासुद्धा समान प्रकारचे अनुभव एकमेकांना सांगण्याचा, त्यावरील चर्चेत सहभागी होण्याचा एक ताकदीचा व सक्षम बनविणारा मार्ग ठरू शकतो.

रजोनिवृत्ती हा तुमच्या आयुष्यातील केवळ एक पुढचे प्रकरण आहे, आयुष्य संपूर्णपणे जगण्यातला अडसर नव्हे. तुम्ही काही समस्यांना सामोऱ्या जात असाल तर आपल्या डॉक्टरांशी बोला आणि योग्य ती देखभाल मिळवा. योग्य पाठबळाच्या साथीने तुम्ही नेहमीप्रमाणेच भरभरून जगू शकता आणि आपल्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करू शकता.

Web Title: Menopause balance essential tips for women to manage work and health effectively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • menopause
  • Women
  • women health

संबंधित बातम्या

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
1

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे
2

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी
3

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
4

गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.