टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
जगभरात सगळीकडे २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. क्षयरोगाविरुद्धच्या लढाईला आणखीन बळकटी करण्यासाठी आणि लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी सगळीकडे जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. जगभरात टीबी सारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. टीबी झाल्यानंतर फुफ्फुसांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे काहीवेळा श्वासांच्या समस्या उद्भवणे किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवतात. टीबी हा फुफ्फुसांसंबधित गंभीर आजार आहे. क्षयरोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये खोकला, छातीत दुखणे आणि खोकल्यातुन किंवा थुंकीमधून रक्त येऊ लागते. संसर्गजन्य आजाराचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.टीबी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांही टीबी होऊ शकतो.(फोटो सौजन्य – iStock)
टीबी हा गंभीर आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार झाल्यानंतर फुफ्फुसांच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. फुफ्फुसांवर परिणाम झाल्यानंतर शरीराच्या इतरही अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ खोकला आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
डिजिटल युगात वाढतोय Cervical Pain चा धोका! लक्षणे ओळखून वेळीच घ्या योग्य ते औषध उपचार
टीबी रोखण्यासाठी बीसीजी लस घेणे सगळ्यात जास्त प्रभावी आहे. ही लस जन्म झालेल्या लहान बाळांना दिली जाते. गंभीर स्वरूपाच्या क्षयरोगापासून संरक्षण करण्यासाठी जन्मताच लस दिली जाते. टीबीचे जीवाणू हवेतून पसरतात, त्यामुळे मास्क लावणे बंधनकारक असते. निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप इत्यादी गोष्टी फॉलो केल्यास शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. टीबी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.