Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये असंख्य समस्या उद्भवतात. रक्ताच्या गाठी पडू लागल्यानंतर महिलांना असह्य वेदना होतात. जाणून घ्या रक्ताच्या गाठी पडणे योग्य की अयोग्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 05:30 AM
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात?
रक्ताच्या गाठी पडणे योग्य की अयोग्य?
मासिक पाळीच्या चक्रात कशामुळे बदल होतो?

मासिक पाळी येणे ही स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. सामन्याता मासिक पाळी महिन्यातील ४ ते ५ दिवस असते. या दिवसांमध्ये महिलांना असंख्य त्रासांना सामोरे जावे लागते. शरीरातील घाण रक्त मासिक पाळीत शरीराच्या बाहेर पडून जाते. पण शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे, आहारात सतत होणारे बदल आणि मानसिक तणावामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो. काहीवेळा मासिक पाळी खूप जास्त येते तर काही वेळा पाळी तारीख होऊन गेल्यानंतर येते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी, पाठदुखी, वेदना होणे, रक्तस्त्राव कमी जास्त होणे, रक्ताच्या गाठी पडणे तर काहींना उलट्या, मळमळ होऊन अजिबात खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळी आल्यानंतर रक्ताच्युअ गाठी पडणे हे अतिशय सामान्य वाटत असेल तरीसुद्धा काहीवेळा महिलांच्या शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. याच समस्येला मेंन्स्ट्रुअल क्लॉट्स असे सुद्धा म्हणतात. रक्ताच्या गाठी पडल्यामुळे कंबर आणि पोटात खूप जास्त वेदना होतात. ज्यावेळी स्त्रियांना मासिक पाळी येते तेव्हा गर्भाशयात जमा झालेले रक्त आणि ऊती यांची जेलीसारखी गाठ तयार होते. याच गाठीमुळे मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गाठी पडणे सामान्य असले तरीसुद्धा ७ दिवसांच्या वर जर रक्ताच्या गाठी पडत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढल्यानंतर मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होतो आणि वेदना होतात. पण मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त प्रमाणात रक्ताच्या गाठी पडत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण हे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. रक्ताच्या गाठी जेलीसारख्या असतात. पाळीदरम्यान पडणाऱ्या रक्ताच्या गाठी थायरॉईड, व्हिटॅमिन-बी १२ किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे पडण्याची शक्यता असते. तसेच ओव्हेरियन सिस्ट, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस आणि फायब्रॉइड्स यांसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर सुद्धा रक्ताच्या गाठी पडतात.

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

एंडोमेट्रिओसिस:

मासिक पाळीच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एंडोमेट्रिओसिसमध्ये ज्यामध्ये गर्भाशयाचे अस्तर बाहेरून आणि प्रजनन मार्गात वाढू लागते. एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वेदनादायक रक्तस्त्राव आणि मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होतात. याशिवाय गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल दिसू लागतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताच्या गाठी जात असल्यास थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीरियड्समध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे सामान्य आहे का?

    Ans: होय, लहान आकाराच्या रक्ताच्या गुठळ्या होणे सामान्य आहे, विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा जड प्रवाहाच्या वेळी.

  • Que: रक्ताच्या गुठळ्या का होतात?

    Ans: जेव्हा मासिक पाळीचा प्रवाह जास्त असतो, तेव्हा शरीरातील नैसर्गिक अँटीकोआगुलंट्स (रक्त गोठण्यापासून रोखणारी द्रव्ये) रक्त वेगाने पातळ करू शकत नाहीत, ज्यामुळे गुठळ्या तयार होतात.

  • Que: गुठळ्यांचा रंग कसा असतो?

    Ans: या गुठळ्या गडद लाल किंवा तपकिरी रंगाच्या दिसू शकतात.

Web Title: Why do blood clots occur during menstruation know whether passing blood clots is normal or a health concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Menstrual health
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Infertility: वंध्यत्व उपचारांसाठी मोठी सुविधा! प्रगत प्रजनन उपचारांची उपलब्धता होणार अधिक सक्षम, जाणून घ्या सविस्तर
1

Infertility: वंध्यत्व उपचारांसाठी मोठी सुविधा! प्रगत प्रजनन उपचारांची उपलब्धता होणार अधिक सक्षम, जाणून घ्या सविस्तर

Menstrual Health: महिलांनो, Period Cramps ने हैराण झाला आहात? ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढू शकतात पोटात वेदना
2

Menstrual Health: महिलांनो, Period Cramps ने हैराण झाला आहात? ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढू शकतात पोटात वेदना

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
3

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Women Health: महिलांनी शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नये दुर्लक्ष, वाढू शकतात मासिक पाळीच्या समस्या
4

Women Health: महिलांनी शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नये दुर्लक्ष, वाढू शकतात मासिक पाळीच्या समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.