
पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा (Photo Credit - X)
मोहिमेचे उद्दिष्ट आणि घोषवाक्य
कुटुंब नियोजनाची जबाबदारी जी अनेकदा महिलांनाच पार पाडावी लागते, त्यात पुरुषांचा सहभाग वाढविणे, पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढवणे, पुरुष नसबंदी शखक्रियेबाबत समाजात जनजागृती करणे, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ४ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असणाऱ्या या मोहिमेचे पोषवाक्य ‘स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार’ असे ठेवण्यात आले आहे.
पुरुष नसबंदीचे फायदे
पुरुष नसबंदी ही कुटुंब नियोजनाची अत्यंत प्रभावी पद्धत असून स्त्री नसबंदीच्या तुलनेत अत्यंत सोपी, सुरक्षित व कमी गुंतागुंतीची असते. या शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णालयातून घरी जाता येते. या शस्त्रक्रियेमुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत असणारा गैरसमज दूर करण्यात येणार आहे.
दोन टप्प्यात मोहीम
या मोहिमेंतर्गत २१ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पहिल्या टप्यात ‘संपर्क आठवडा’ महणून राबविण्यात येईल. जिल्ह्यातील आशा व आरोग्य कर्मचारी यांच्याद्वारे या कार्यक्रमासाठी योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करून त्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी विनंती केली जाईल. गैरसमज दूर करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करून पुरुष नसबंदी शखक्रियेचा स्वीकार करण्यासाठी पुरुषांना प्रवृत्त करण्यात येईल. यापूर्वी ज्या लाभाथ्यांनी ‘नो स्कालपेल व्हॅसेक्टों मी’चा अवलंब केलेला आहे, त्यांच्यामार्फत या मोहिमेचा प्रचार व प्रसार करून माहिती देण्यात येईल, या टप्प्यात ज्या आरोग्य संस्थांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सेवा देण्यात येणार आहे, अशा आरोग्य संस्थांची यादीदेखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांशी साधा संपर्क
या मोहिमेत नागरिकांनी, विशेषतः पुरुषांनी सक्रिय सहभागी कहावे, तसेच अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
विशेष पथके तैनात
मोहिमेच्या दुसरा टप्पा ‘सेवा आठवडा २८ नोवोबर ते ४ डिसेबर या कालावधीत होईल, यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील शस्त्रक्रिया गृहामध्ये स्टैंडर्ड प्रोटोकॉल ऑफ स्टरलायड्रोशन सर्व्हिसेस’ चा अवलंब कसन पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली जाईल, शासकीय वैद्यकीय अधिका-यांबरोबरच आवश्यकतेप्रमाणे खासगी व सेवानिवृत्त सर्जन उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत.