संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' भाज्यांचे करा सेवन
युरिक ॲसिड म्हणजे काय?
युरिक ॲसिड वाढल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे?
सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. पण काहीवेळा अचानक हातपाय दुखणे, कंबर दुखणे, संधिवातामुळे पाय वाकडे होणे, चालताना किंवा उभे राहताना गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ही समस्या शरीरात वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे उद्भवते. रक्तात किंवा हाडांमध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. पण कालांतराने या लक्षणांकडे वाढ झाल्यानंतर शरीराला खूप जास्त हानी पोहचते. युरिक ॲसिडचे क्रिस्टल सांध्यांमध्ये साचून राहिल्यानंतर गाऊट, सूज, सांधेदुखी आणि किडनीच्या आजारांची शरीराला लागण होते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हाडांमध्ये साचून राहिलेले युरिक ॲसिड आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. याशिवाय या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काकडी खायला खूप जास्त आवडते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे रक्तात साचून राहिलेली घाण सहज बाहेर पडून जाते. काकडीच्या थंडाव्यामुळे किडनीचे कार्य सुधारते. याशिवाय सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक ऍसिडी बाहेर पडून जाते. काकडीचे सेवन सॅलड किंवा डिटॉक्स ड्रिंक बनवून सुद्धा करू शकता. काकडीचा रस प्यायल्यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या घटकांमुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. गाजरपासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. गाजरमध्ये असलेल्या नैसर्गिक दाहशामक गुणधर्मांमुळे गाऊट आणि सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचे टोमॅटो चवीला अतिशय सुंदर लागते. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि लायकोपीन आढळून येते, ज्यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहते. युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी उपाशी पोटी टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडून जाईल. टोमॅटोपासून तुम्ही सूप सुद्धा बनवू शकता.






