
महिलांनो, Period Cramps ने हैराण झाला आहात? ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढू शकतात पोटात वेदना
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेदना का होतात?
पाळी आल्यानंतर या पदार्थांचे सेवन करणे टाळा?
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
Menstrual Health: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना ओटीपोटात खूप जास्त वेदना होतात. कंबर दुखणे, पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, क्रॅम्प इत्यादी समस्या वाढू लागतात. गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकताना निर्माण होणाऱ्या ‘प्रोस्टाग्लँडिन्स‘ रसायनांमुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे पोटात खूप जास्त वेदना होऊन थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. दैंनदिन आहारातील चुकीच्या सवयी, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पोट फुगणे, थकवा, पचनाच्या समस्या आणि अस्वस्थता इत्यादी समस्या मासिक पाळीचे खूप जास्त कठीण बनवतात. त्यामुळे अतिशय किरकोळ वाटणाऱ्या त्रासांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कोणत्या पदार्थांचे आहारात अजिबात सेवन करु नये, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
लहान मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत सगळ्यांच वेफर्स, इन्स्टंट नूडल्स, पॅकबंद स्नॅक्स खायला खूप जास्त आवडते. पण या पदार्थांमध्ये सोडिअम असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवंसामध्ये आहारात तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे अस्वस्थता वाढून आरोग्य बिघाडून जाते. त्यामुळे मीठ खाणे पूर्णपणे बंद करण्याऐवजी ताज्या भाज्या, फळे, तृणधान्ये आणि कडधान्यांचे सेवन करावे. तसेच चवीसाठी लिंबू आणि मसाल्यांचा वापर करावा.
सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत चहा किंवा काॅफी पिण्याची सवय असते. या पदार्थांमध्ये असलेले कॅफीन मासिक पाळीच्या वेदना वाढवते. त्यामुळे अतिप्रमाणात चहा किंवा काॅफीचेे सेवन करु नये. कॅफीनच्या अतिसेवनामुळे झोप बिघडणे, ॲसिडिटी, धडधड होणे आणि छातीतील वेदना वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे चहा-कॉफी पिण्याऐवजी पाणी, हर्बल टी किंवा लिंबू पाणी प्यावे. यामुळे पचनाचे विकार आणि बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते.
Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदनांमुळे अन्न पदार्थ खाण्याची अजिबात ईच्छा होत नाही. पण उपाशी न राहता, डाळ, बीन्स, मोड आलेली कडधान्ये, टोफू, पनीर, दही, सुकामेवा, बिया आणि अंडी यांसारख्या प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल. रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन चक्कर येणे, चिडचिड होणे, थकवा येणे आणि अशक्तपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
Ans: मासिक पाळीदरम्यान गर्भाशय आकुंचन पावत असल्याने पोटात कळा आणि वेदना होऊ शकतात. काही महिलांमध्ये या वेदना सौम्य तर काहींमध्ये अधिक तीव्र असू शकतात.
Ans: अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ, साखरयुक्त पदार्थ आणि जास्त कॅफीन असलेली पेये काही महिलांमध्ये ब्लोटिंग किंवा अस्वस्थता वाढवू शकतात. आपल्या शरीराला कोणते पदार्थ त्रास देतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
Ans: कॅफीन काही महिलांमध्ये पाळीशी संबंधित अस्वस्थता, झोपेच्या समस्या किंवा चिंता वाढवू शकते. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास चहा-कॉफीचे सेवन कमी करून पाहता येते.