Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fenugreek seeds water: वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल, मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Fenugreek seeds water Health Benefits: मेथी दाणा हा पोषक घटकांनी समृद्ध असून, त्याचे पाणी नियमित सेवन केल्यास पचन सुधारण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. परंतु, मेथीचे पाणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पिणे आवश्यक आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 07:30 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल
  • मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे
  • जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत
भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असलेला मेथी दाणा हा केवळ स्वयंपाकातील मसाला नसून पोषक घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. आयुर्वेदातही मेथीचा वापर विविध आरोग्य समस्यांवर सहाय्यक उपाय म्हणून केला जातो. मेथीचे पाणी नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यापासून ते रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, याचे सेवन योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत

मेथीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे शरीरातील ग्लुकोजचे शोषण नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर ठरते.

पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत

मेथीचे पाणी नियमित घेतल्यास अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया अधिक सुरळीत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मेथीतील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अतिरिक्त खाण्याची सवय कमी होण्यास मदत होते. परिणामी वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाऊ शकते.

त्वचा, केस आणि महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. हे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच हार्मोनल संतुलन राखण्यासही मेथी उपयुक्त ठरू शकते.

मेथीचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत

एका ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हलके उकळवून घ्या आणि पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. इच्छेनुसार भिजलेले मेथी दाणेही खाऊ शकता.

सेवन करताना घ्या ही काळजी

मेथीचे पाणी मर्यादित प्रमाणातच पिणे योग्य ठरते. गर्भवती महिला, मधुमेहाची औषधे घेणारे किंवा इतर गंभीर आजार असलेल्यांनी नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत: हून घेताय ‘ही’ औषधे? जीवावर बेतेल; जाणून घ्या दुष्परिणाम

Web Title: Methi water benefits weight loss blood sugar control right time right way to drink fenugreek water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Diabetics
  • fenugreek water
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
2

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात
3

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
4

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.