Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनारसे बनवताना चुका होतात? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

दिवाळी सणाला सगळीकडे कायमच अनारसे बनवले जातात. पण बऱ्याचदा अनारसे बनवताना चुका होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अचूक प्रमाण घेऊन अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2025 | 02:49 PM
अनारसे बनवताना चुका होतात? 'या' सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे

अनारसे बनवताना चुका होतात? 'या' सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे

Follow Us
Follow Us:

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे साफसफाई, फराळ, खरेदी इत्यादींची मोठी लगबग आहे. दिवाळी सणाला सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. घरात दिव्यांची आरास करून अंगणात सुंदर सुंदर रांगोळी काढली जाते. याशिवाय दिवाळीच्या फराळात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ अनारसे. घरातील प्रत्येकालाच अनारसे खायला खूप जास्त आवडतात. अनारसे बनवल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाहीत. चवीला गोड, जाळीदार, हलका आणि कुरकुरीत अनारसे चवीला अतिशय सुंदर लागतात. पण बऱ्याचदा अनारसे बनवताना खूप चुका होतात, ज्यामुळे पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. चुकीचे प्रमाण घेतल्यामुळे अनारसाची चव बदलून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जाळीदार कुरकुरीत अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवले अनारसे चवीला अतिशय सुंदर लागतात. जाणून घ्या अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी… गुजराती स्टाईलमध्ये बनवा ‘मसाला मेथी खाखरा’

साहित्य:

  • तांदूळ
  • गूळ
  • खसखस
  • तेल
  • तूप
Ragi Thalipeeth Recipe: घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ, पोट राहील भरलेले

कृती:

  • अनारसे बनवण्यासाठी सर्वप्रथम, दोन वाटी तांदूळ घेऊन ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवून तांदूळ भिजत ठेवा.
  • त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तांदळामधील पाणी काढून नवीन पाणी टाकून तांदूळ भिजत ठेवा. ही प्रक्रिया पुढील चार दिवस करा.
  • ४ दिवसांनंतर चाळणीवर तांदूळ ओतून त्यातील पाणी काढून घ्या. पाणी व्यवस्थित निघून गेल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर तांदूळ सुकण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात सुकलेले तांदूळ टाकून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेले पीठ चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यानंतर त्यात किसलेले गूळ घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • तयार केलेले डब्यात ठेवून घट्ट झाकण लावून घ्या. दुसऱ्या दिवशी पीठ काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. ही प्रक्रिया पुढील ३ दिवस पुन्हा एकदा करा.
  • तिसऱ्या दिवशी तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. प्लॅस्टिकच्या पिशवीला तूप किंवा तेल लावून त्यावर खसखस दाणे ओतून तयार केलेले गोळे ठेवा आणि हाताच्या बोटानी अनारसे बनवून कढईमधील गरम तेलात मंद आचेवर खसपूस तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जाळीदार खमंग अनारसे.

Web Title: Mistakes made while making anarasa follow these easy tips to make light crispy netted anarase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.