घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात कायमच काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाचणीच्या पिठाचे खमंग टेस्टी थालीपीठ बनवून खाऊ शकता. थालीपीठ बनवण्याची भाजणीच्या पिठाचा वापर केला जातो. पण घरात बऱ्याचदा थालीपीठ भाजणी उपलब्ध नसते. त्यामुळे नाचणीच्या पिठात तुम्ही इतरही वेगवेगळ्या धान्यांचे पीठ मिक्स करू शकता. संपूर्ण शरीरासाठी नाचणी अतिशय गुणकारी ठरते. नाचणीमध्ये असलेले घटक शरीराला कॅल्शियम देतात. याशिवाय रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थालीपीठ खायला खूप जास्त आवडते. नाचणीच्या पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा- अशक्तपणा कमी होतो. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणीच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची ‘लसूण शेव’ घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या
हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी… गुजराती स्टाईलमध्ये बनवा ‘मसाला मेथी खाखरा’