Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहामुळे वाढतोय पित्त, अ‍ॅसिडिटीचा त्रास? मग चहा बनवताना मिक्स करा ‘हा’ १० रुपयांचा पदार्थ, चहा बनेल हेल्दी

अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते त्यामुळे रिकाम्या पोटी कधीच चहाचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला अ‍ॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी कोणते पदार्थ चहात टाकावे, याबद्दल सांगणार आह

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 31, 2024 | 08:42 AM
अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू नये म्हणून चहात मिक्स करा हे' पदार्थ

अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू नये म्हणून चहात मिक्स करा हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

भारतासह इतर सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. भारतामध्ये चहा पिणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सर्वच भारतीयांची सकाळ चहा किंवा कॉफी पिऊनच होते. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. मात्र रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे पित्त आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नये. अ‍ॅसिडिटी, पित्त, अपचन किंवा गॅसची समस्या वाढल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहा बनवताना कोणते पदार्थ मिक्स केल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवणार नाही, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांमुळे चहाची चव सुद्धा वाढेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

आलं:

चहा बनवताना चहामध्ये आलं टाकल्यास चहाची चव वाढेल आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतील. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठीअतिशय पौष्टिक आहेत. शिवाय यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया शांत होते. सकाळच्या वेळी आलं टाकून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही.

बडीशेप:

जेवल्यानंतर बडीशेप खायला सगळ्यांचं आवडते. बडीशेप खाल्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतात. बडीशेप खाल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. सकाळच्या वेळी घरात चहा बनवताना तुम्ही त्यात चिमूटभर बडीशेप टाकल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही. यामुळे चहाचा सुगंध वाढेल.

वेलची:

अनेक घरांमध्ये चहा बनवताना मसाला वेलचीचा नियमित वापर केला जातो. शिवाय सर्वच गोड पदार्थ बनवताना वेलचीचा वापर केला जातो. वेलची वापरल्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. वेलचीचा चहा प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी किंवा इतर वेळी चहा बनवताना त्यात वेलची टाकावी.

लवंग:

प्रत्येक स्वयंपाक घरात लवंग हा पदार्थ असतोच. चहामध्ये तुम्ही लवंग टाकू शकता. यामुळे चहाची चव वाढेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. शिवाय या चहामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सर्दी खोकल्याची समस्या कमी होते. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लवंग चहाचे संबं करावे.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

तुळस:

मागील अनेक वर्षांपासून आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. तुळशीच्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे चहा बनवताना तुम्ही त्यात दोन किंवा तीन तुळशीची पाने टाकू शकता. यामुळे चहाचा सुगंध आणि चव वाढेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mix these ingredients in tea to avoid acidity health care tips home remedies for acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 08:42 AM

Topics:  

  • Ayurvedic Herbstips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.