रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' रसाचे करा सेवन
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. आहारात कमीत कमी साखरयुक्त आणि गोड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय हा आजार झाल्यानंतर आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व, किडणी निकामी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर पथ्य पाळावीत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जगभरात 42.2 कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहे. हल्ली वयात सुद्धा अनेकांना मधुमेह होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. अनेक महागड्या गोळ्या, इंजेक्शन देऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. अशावेळी गोळ्या औषधांच्या सोबतच आयुर्वेदिक उपाय सुद्धा करून पाहावेत, यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या रसाचे आहारात सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हर्बल ज्यूसचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्याचा शरीराला सुद्धा फायदा होतो. दैनंदिन आहारात ता रसाचे सेवन केल्यास शरीरातील इतर आजारांपासून सुद्धा सुटका मिळण्यास मदत होईल. यामध्ये कडुलिंब आणि कारल्याच्या रसाचा सुद्धा वापर करण्यात आला आहे.
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडुलिंब आणि कारल्याच्या रसाचे एकत्र सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. कारल्यामध्ये लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारल्याच्या रसाचे रिकाम्या पोटी सेवन करावे. यामुळे शरीरावर जास्त प्रभाव दिसून येतो.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा कडुलिंबाच्या रसाचे सेवन करावे. या रसामध्ये लोह, विटामिन ए आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय कडुलिंबाचा रस वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच यामुळे तुम्ही अधिक काळ तरुण दिसाल.