त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी नारळाच्या तेलात मिक्स करा 'हा' प्रभावी पदार्थ
Skin Care Tips :- सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजारात असलेल्या महागड्या क्रीम्सचा वापर केला जातो, तर कधी महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण नेहमी नेहमी कोणत्याही क्रीम्स त्वचेवर लावल्यामुळे त्वचा खराब किंवा पिंपल्स आणि मुरूम येण्याची शक्यता असते. याशिवाय पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, मुरुमे, त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचा फुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट किंवा प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
चमकदार आणि मऊ त्वचेसाठी घरच्या घरी ‘या’ पद्धतीमध्ये बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा आतून राहील निरोगी
त्वचा खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी सनस्क्रिन, फेशवॉश, मॉइश्चरायझर किंवा क्रीम्सचा वापर केला जातो. मात्र यासोबतच तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा त्वचेची गुणवत्ता अधिक चांगली आणि मुलायम त्वचा बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. नारळाच्या तेलात सलेले गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नारळाच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
नारळाच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचा सॉफ्ट आणि मुलायम बनवतात. यासाठी वाटीमध्ये नारळाचे तेल घेऊन त्यात बेसन, दही आणि हळद मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर हाताला थोडे पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारेल आणि त्वचा कायम सॉफ्ट राहील. त्वचेवर त्वचेला फेसमास्क त्वचा कोरडी होईपर्यंत ठेवून मसाज करावा. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल आणि त्वचा अतिशय उजळदार दिसेल.
नारळाच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि चेहरा सुंदर दिसू लागेल. उन्हामध्ये सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. याशिवाय पचनसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स आणि बारीक बारीक मुरूम येऊ लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा.
नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. नारळाच्या तेलाने त्वचेवर नियमित मसाज केल्यास त्वचेवरील सर्व डाग निघून जातील आणि चेहरा स्वच्छ होईल. सुंदर त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेले ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावे.