काचेसारख्या नितळ पांढऱ्या शुभ्र त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा 'हे' पदार्थ
सर्वच महिलांना आपली त्वचा गोरी आणि चमकदार असावी, असे नेहमीच वाटत असते. त्वचा सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक, फेसमास्क किंवा फेस सीरम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेवर काही दिवसांमध्येच चमकदार ग्लो येऊन चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलू लागतो. अपुऱ्या झोपेमुळे आणि बिघडलेल्या पचनक्रियेमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कितीही उपाय केले तरीसुद्धा कमी होत नाहीत. पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग कायमच चेहऱ्यावर तसेच राहतात. त्वचेचा सावळा रंग आणखीनच गोरा करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यामुळे काही काळच त्वचा अतिशय चमकदार आणि ग्लोइंग दिसते. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
महिनाभरात होईल केसांची घनदाट वाढ! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास केस गळणे होईल कायमचे कमी
वातावरणातील बदल, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. यामुळे तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे अतिशय महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी आणि स्किन उजळदार करण्यासाठी तांदळाच्या पिठात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तांदळाचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचेवरील धूळ, माती, डेड स्किन कमी होते.
मोठ्या वाटीमध्ये चमचाभर तांदळाचे पीठ घेऊन त्यात कोरफड जेल आणि विटामिन सी कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर काहीवेळ ठेवून पाण्याने त्वचा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तांदळाचा फेसपॅक लावल्यास त्वचा स्वच्छ होते. तांदळाच्या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेचा रंग हळूहळू नितळ होऊन त्वचा आकर्षक दिसेल.
मेकअप करण्याआधी Malaika Arora फॉलो करते ‘या’ गोष्टी, जाणून घ्या मालयकाचे स्किन केअर रुटीन
कोरफड जेल मध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी कायमच प्रभावी ठरतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. कोरफडमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा कायमच सुंदर आणि उजळदार करण्यासाठी मदत करतात. याशिवाय तांदळाच्या पिठात असलेले गुणधर्म त्वचेवरील चमक कमी करण्यासाठी मदत करतात. त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी तांदळाच्या फेसपॅकचा वापर करावा.