मेकअप करण्याआधी Malaika Arora फॉलो करते 'या' गोष्टी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ब्युटी, फॅशन आणि फिटनेसमुळे कायमच सगळीकडे चर्चेत असते. तिचे अभिनयातील काम सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वय वाढून सुद्धा मलायका अरोरा कायमच हेल्दी आणि तरुण दिसते. तिचा फिटनेस, फिगर आणि चेहरा कायमच तरुण आणि सुंदर दिसतो. वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा तिची त्वचा अजूनही तरुण आणि उठावदार आहे. वय वाढून सुद्धा तिचे सौंदर्य कमी झालेले नाही. सर्वच महिलांना अभिनेत्रींनप्रमाणे सुंदर आणि उठावदार त्वचा हवी असते. सुंदर आणि कायमच ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री मेकअप करण्याआधी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा चमकदार त्वचा मिळवू शकता.(फोटो सौजन्य – pintrest)
चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! टोनर म्हणून वापरा ‘हे’ जादुई पाणी, त्वचा होईल देखणी
मलायका अरोरा कायमच तिच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही व्हिडिओ शेअर करत असते. कधी स्किन केअर रुटीन, मेकअप तर कधी व्यायामाचे व्हिडिओ चाहत्यांपर्यंत पोहचवते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने प्री-मेकअप स्किनकेअर रुटीन दाखवले आहे. मेकअप करण्याआधी स्किन केअर रुटीन फॉलो करणे खूप जास्त महत्वाचे आहे. त्यात तिने चमकदार त्वचेसाठी नेमकं काय करावं? याबद्दल काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊया.
मलायका अरोरा मेकअप करण्याआधी सगळ्यात पहिले चेहऱ्यावर हलके फेस ऑइल लावते. ज्यामुळे त्वचेला योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळत. त्यानंतर चेहऱ्यावर रोलर फिरवते. यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्वचेच्या सर्व पेशी मोकळ्या होतात आणि त्वचा कायमच सुंदर दिसते.
चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी मलायका गुआ शा टूलचा वापर करते. हे टूल वापरल्यामुळे वाढत्या वयात सुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. त्यानंतर ती डोळ्यांखाली पॅचेस लावते. अपुऱ्या झोपेमुळे वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी हे पॅचेस प्रभावी ठरतात. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी स्किन केअर रुटीनमध्ये आय क्रीम किंवा पॅचेसचा वापर करावा.
मलायका अरोरा सांगते, स्किन केअर रुटीन फॉलो करताना त्वचेसोबतच मानेवर सुद्धा मसाज करणे आवश्यक आहे. मेकअप करण्याआधी हलक्या हाताने मानेवर मसाज करावा. यामुळे चेहरा आणि मान दोघेही एकसारखे दिसू लागतात.
आठवड्यातून दोनदा केसांना लावा ‘हे’ गुणकारी तेल! गुडघ्यांपर्यांत होईल केसांची मजबूत वाढ, दिसाल सुंदर
स्किन केअर रुटीन पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी लीप बाम लावावे. लिप बाम लावल्यामुळे ओठ हायड्रेट आणि गुलाबी होतात. याशिवाय ओठांचे सौंदर्य सुधारते. ओठ कायमच निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी लीप बाम लावणे आवश्यक आहे.